- शिक्षणं क्षेत्राला काळीमा फासणारी घटना शिक्षकाकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले
एरंडोल,:-आपल्या सहकारी शिक्षकांकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना पिंपळकोठा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे वय ५५ वर्ष यांना लाच लुचपत प्रतिबंधक जळगाव विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले ही कार्यवाही २० जानेवारी २०२५ सोमवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मुख्याध्यापकांच्या कार्यालयात करण्यात आली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे
पिंपळकोठा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नुकतीच शिक्षण विस्तार अधिकाऱ्याने तपासणी केली होती या तपासणीमध्ये चांगला शेरा यावा म्हणून तपासणी करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये मागितले आहेत आणि ते सर्व शिक्षकांना द्यावे लागतील असे मुख्याध्यापक सोनवणे यांनी त्यांच्या सहकारी शिक्षकांना सांगून सर्वांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतले होते पण दोन शिक्षकांकडे पैसे येणे बाकी होते त्याबाबत हजार रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक सोनवणे यांनी केले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या पथकाने त्यांना एक हजार रुपयाची लाच घेताना पकडले
याप्रकरणी मुख्याध्यापक सोनवणे यांना अटक करण्यात आले आहे. एसीबी चे तपासाधिकारी हे पुढील तपास करीत आहेत
शिक्षणं क्षेत्राला काळीमा फासणारी घटना शिक्षकाकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
