- *सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी नागरिकांकडून २ हजार रुपये लाचेची मागणी……….!*
*एरंडोल येथील नगरसेवक नितेश चौधरी यांचा पत्र परिषदेत सनसनाटी आरोप………!*

एरंडोल प्रतिनिधी – येथील सोमवारी नगरसेवक नितेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी महावितरण कार्यालयात सर्रास २ हजार रुपयांची मागणी नागरिकांकडून होत असल्याचा गंभीर आरोप केला.याप्रकरणी चौधरी यांनी व्हिडिओ पुरावे व संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेपुढे मांडली.तसेच जळगाव अधीक्षक अभियंता यांच्याकडे नितेश चौधरी यांनी अधिकृत लेखी तक्रार केल्याचे सांगितले.
या तक्रारीत खालील मागण्या करण्यात आल्या आहेत.
१) सदर लाच मागणी प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
२) चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर कर्मचारी व विभागीय उपकार्यकारी अभियंता यांना तात्पुरते निलंबित करण्यात यावे.
३) दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
४) भविष्यात सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी.
५) सदर प्रकरणाची प्रत माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात यावी.
सदर प्रकरणासंदर्भातील व्हिडिओ पुरावा असलेली पेन ड्राईव्ह या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. आपण या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. असे सदर तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रार निवेदन देताना नगरसेवक नितेश चौधरी, ॲड अजिंक्य काळे, ॲड आकाश महाजन, वैभव चौधरी, करण पाटील, कल्पेश चौधरी, मुकेश चौधरी, सचिन पाटील, ॲड नयन आरखे, रोहन महाजन, अक्षय चौधरी हे उपस्थित होते.
सोलर प्रकरणाच्या सबसिडीसाठी नागरिकांकडून २ हजार रुपये लाचेची मागणी……….!* *एरंडोल येथील नगरसेवक नितेश चौधरी यांचा पत्र परिषदेत सनसनाटी आरोप………!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
