एरंडोल – राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र राज्यात यंदा अनेक अपक्षांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे उमेदवार टेशनमध्ये आले आहेत.नुकतेच एरंडोल पारोळा मतदार संघात २५ ऑक्टोबर २०२४ रोजी अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन यांनी मोठ्या जनसमुदायासह शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघात भगवान आसाराम महाजन यांनी अपक्ष म्हणून हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत समाज उपयोगी काम करत नागरिकांशी संवाद साधला आहे.त्यांचा उमेदवारी अर्ज एरंडोल या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केलेला आहे.यावेळी एरंडोल पारोळा व भडगाव विधानसभा मतदार संघातील असंख्य मतदार हजर होते.यात पुरूषांसोबत महिलांची संख्या लक्षणीय होती.दरम्यान भगवान महाजन यांच्या उमेदवारीमुळे प्रस्थापितांना नक्कीच डोक्याला ताण होणार आहे तसेच सदर निवडणूक ही रंगतदार होणार आहे.
याप्रसंगी उमेदवार भगवान आसाराम पाटील (भगवान भाऊ महाजन) यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्याकडे दाखल करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत अंचळगाव सरपंच विजय पाटील, गायत्री पाटील, दर्शना तिवारी, प्रवीण महाजन, नाना महाजन, राहुल तिवारी, पांडुरंग महाजन, छबुलाल चौधरी, हिरामण देवरे, गुलाब महाजन मुख्तार पटेल, नितीन पाटील, अंकुश चव्हाण, अन्वर पिंजारी, विकास देशमुख, संतोष महाजन सुबोध शिंदे यांच्यासह एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी भगवान महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,वीर भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
*अपक्ष उमेदवार भगवान महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल,हजारोंच्या संख्येने लोक सहभागी….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm


