-
*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*


एरंडोल प्रतिनिधी – शहरातील हायवे लगत असलेल्या हॉटेल्सवर प्रशासकीय पथकाने धडक कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर दणका दिला आहे. या कारवाईत दोन नामांकित हॉटेल्समधून अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.२३ मार्च २०२६ रोजी तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हायवेवरील प्रमुख हॉटेल्सची तपासणी केली. यामध्ये खालील हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.त्यात हॉटेल जत्रा येथे एक घरगुती गॅस सिलिंडर अवैध व्यावसायिक वापर म्हणून जप्त.तर हॉटेल मयुरी गार्डन येथे नियमांचे उल्लंघन करून वापरले जाणारे एक सिलिंडर जप्त.याशिवाय हॉटेल शिवानंद आणि हॉटेल कृष्णा यांचीही कसून तपासणी करण्यात आली.
पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक वैराळकर व पुरवठा निरीक्षक वैशाली पाचपोर यांच्या पथकाने हे सिलिंडर जप्त करून तसा अहवाल माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी सादर केला आहे.
“अनुदानीत घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
*एरंडोलमध्ये हॉटेल्सवर प्रशासनाची धाड, घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर उघड……..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
