- *एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, हायवे चौफुली व ओमनगर चौक या प्रमुख ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.तसेच डि.डी.एस.पी.महाविद्यालय,न्यु इंग्लिश मिडियम स्कूल यांच्यासह विविध शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला.या परिसरात शहराच्या मुख्य रस्ता भगव्या पताकांनी सजविण्यात आला होता.तसेच भव्य बॅनर्स देखील लावण्यात आले होते.
याप्रसंगी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला.राजे संभाजी पाटील सामाजिक व सांस्कृतिक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष तथा प्रा.मनोज पाटील यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा.शिवाजीराव अहिरराव यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.डी.पाटील यांनी केले.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी,दशरथ महाजन, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, जगदीश पाटील व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी शिवरायांचा इतिहास व जीवन कार्याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन करून सामाजिक सलोखा व बंधुभाव जोपासण्याचे आवाहन केले.
यावेळी अमित पाटील,डॉ.सुरेश पाटील, प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड,तहसीलदार प्रदीप पाटील,पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रमेश महाजन, प्रा.शिवाजीराव अहिरराव,माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील,अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड,अभिजित पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, जगदीश पाटील,कृष्णा महाजन, रविंद्र लाळगे, संतोष वंजारी, गजानन पाटील, डॉ.राजेंद्र चौधरी,डॉ.सुधीर काबरा,डॉ.उमेश पाटील, शैलेश चौधरी,न.पा.चे कार्यालयीन अधीक्षक विनोद पाटील, डॉ.प्रशांत पाटील, प्रा.आर.एस.पाटील,प्रा.जी.आर.महाजन, डॉ.पळशीकर, जाधवराव जगताप आदी मान्यवर व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.- हायवे चौफुलीवर प्रा.आर.ए.शिंदे व मित्र परिवारातर्फे शिवप्रतिमेचे पुजन व अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच ओमनगर चौकात गजानन पाटील व मित्र परिवारातर्फे देखील शिवजयंती साजरी करण्यात आली.या दोन्ही ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शिवरायांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी शिवरायांच्या पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
Home
»
महाराष्ट्र
»
*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!*
*एरंडोल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात,विविध कार्यक्रमांचे आयोजन….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm




