-
*एरंडोल येथे ज्वारी-मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, ऑनलाईन बिघाडामुळे दिवसभर हाल,ऑफलाइन नोंदणीचा पर्याय……….!*
एरंडोल प्रतिनिधी – शासकीय ज्वारी व मका खरेदीसाठी ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे एरंडोल येथील शेतकी संघ कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी ६ एप्रिल २०२६ रोजी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली. दिवसभर नोंदणी प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांना उन्हात तासन्तास रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळपासूनच शेकडो शेतकरी नोंदणीसाठी दाखल झाले होते. मात्र ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित न झाल्याने कोणतीही प्रक्रिया पुढे सरकली नाही. सायंकाळी उशिरा काही हालचाल सुरू झाली असली तरी गोंधळाचे वातावरण कायम राहिले. अनेक शेतकऱ्यांनी रात्रीपासूनच पुन्हा रांगा लावल्याने मंगळवारी सकाळी गर्दीत आणखी वाढ झाली.
प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यासाठी कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. “ दिवसभर रांगेत उभे आहोत, पण नोंदणी कधी सुरू होईल याची माहिती नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, वाढती गर्दी आणि शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन मृणालताई अमोल पाटील यांच्या मध्यस्थीने ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारून नोंदणी सुरू करण्यात आली व शेतकऱ्यांना कुपन वाटप करण्यात आले. यावेळी विनोद पाटील, रवी जाधव, रवी चौधरी यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
शासनामार्फत ज्वारीसाठी ३७५० रुपये तर मक्यासाठी २४०० रुपये दर जाहीर झाल्याची माहिती मिळाली आहे.
*एरंडोल येथे ज्वारी-मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी, ऑनलाईन बिघाडामुळे दिवसभर हाल,ऑफलाइन नोंदणीचा पर्याय……….!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm




