- *एरंडोल येथे १६ मार्च २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन…..!*
एरंडोल प्रतिनिधी – येथे १६ मार्च २०२५ रोजी हाॅटेल कृष्णा च्या मैदानावर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.डाॅ.अनंत राऊत ( नांदेड) हे अध्यक्षस्थान भुषवणार आहेत.रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंद राज आंबेडकर यांच्या हस्ते संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
दिवसभराच्या सत्रामध्ये एकूण ३ परिसंवाद होणार आहेत.राज्यभरातून ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत, संविधान अभ्यासक व संविधान चळवळीतील कार्यकर्ते या परिषदेला उपस्थिती देणार आहेत.सर्व स्तरावरील नियोजन झाले असून सदर संविधान परिषद ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास मुख्य संयोजक प्रा.भरत शिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून संविधान बाईक रॅलीच्या आयोजनाने होणार आहे.सकाळी ९ वाजता परिषदेचा उद्घाटन करण्यात येणार आहे.
*एरंडोल येथे १६ मार्च २०२५ रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन…..!*
संपादक - कैलास महाजन
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm

