-
*एरंडोल येथे तहसील पथकाने गिरणा नदी पात्रात अचानक धाड टाकून ४० ब्रास अवैध वाळू व उपसा साहीत्य जप्त……!*

एरंडोल प्रतिनिधी -तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना मौजे कढोली येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती २२ मे २०२५ रोजी प्राप्त झाली.यावेळी एरंडोल महसूल पथकाने कढोली येथे अचानक धडक कारवाई करीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या २ पुली,दोरखंड व फावडे जप्त केले. याशिवाय गिरणा नदीपात्रा लगत असलेल्या जवळपास ४० ब्रास वाळू साठा जप्त करून सरपंच तथा ग्राम दक्षता समिती अध्यक्ष किरण कोळी यांचे ताब्यात दिला आहे व सदर साठा सुरक्षिततेबाबत पोलीस स्टेशन एरंडोलचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांना लेखी अवगत करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रिंगणगाव संजय साळुंखे,मंडळ अधिकारी उत्राण नदीम शेख,नितीन पाटील तलाठी कढोली,रोहित इंगळे तलाठी वैजनाथ यांनी केली
मनोरंजन
संबंधित बातम्या
स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली
May 24, 2026
6:14 pm
*प्रमोद महाजन यांची भाजपात युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती………….!*
May 16, 2026
9:12 pm
